देशी कोंबड्यांमधील कृमीचे नियंत्रण

                       

कोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येणे कठीण असते. परसातील कोंबड्यांना गोलकृमी आणि पट्टकृमी यांचा प्रादुर्भाव होत असतो. 
ठराविक कालावधीनंतर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोलकृमी व पट्टकृमीनाशकाची मात्रा देणे गरजेचे आहे.

उपाययोजना

● कोंबड्यांना कृमी नाशकाची मात्रा पाणी किंवा खाद्यामधून द्यावी.

● एका कोंबडीला जंतनाशक औषधी देण्याचा खर्च केवळ २ ते ३ रुपये येतो.अस्कॅरीडीया गॅली या कृमीबरोबर बऱ्याच कृमींचा प्रादुर्भाव कोंबड्यांना होतो. हे लक्षात घेऊन जंतनाशकाची शिफारशीनुसार मात्रा द्यावी.  

● विदेशी कोंबड्यांपेक्षा परसातील कोंबड्यांना गोलकृमी (अस्कॅरीडीया गॅली) आणि पट्टकृमी (रॅलीटीना) यांचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून ठराविक कालावधीनंतर गोलकृमीनाशक व पट्टकृमीनाशकांची मात्रा देणे हे आर्थिकदृष्ट्या परवडते.  

● कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येणे कठीण असते. पट्टकृमीचे तुकडे वेळोवेळी विष्टेद्वारे बाहेर टाकले जातात. म्हणून पट्टकृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे केवळ विष्टेची तपासणी केल्यानंतरच निदर्शनास येते. 

● कृमीच्या नियंत्रणासाठी परसामध्ये पाळलेल्या कोंबडी पिलांना १ ते ३ महिन्यांपर्यंत दोन वेळेस जंतनाशकाची मात्रा देणे गरजेचे असते. 

● मोठ्या कोंबड्यांना विशेषतः पावसाळ्यामध्ये गोलकृमीनाशक व पट्टकृमींनाशकाची मात्रा एक ते दोन वेळेस द्यावी. यामुळे जंताचा प्रादुर्भाव कमी होऊन वजन आणि अंडी उत्पादनात वाढ होते. 

● परसातील कोंबड्यांना कृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो, त्यामुळे त्यांना जंतनाशकाची मात्रा देणे गरजेचे असते.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment