
दोडा अवस्थेतील बागेमध्ये द्राक्षघडाची लांबी वाढण्याच्या दृष्टीने संजीवकांची फवारणी जास्त तीव्रता वापरून व जास्त वेळा केली जाते.
ही फवारणी थंड वातावरणात केल्यास दोडा अवस्थेतील फुलोऱ्याचे आवरण चिकटून राहील, त्यामुळे कुजेची समस्या येऊ शकते.
या
वेळी मुख्यत: जीए फवारणीचे जास्त प्रमाण आणि बागेत आर्द्रता असताना
वेलीमध्ये उपलब्ध असलेली संजीवके आणि वापरण्यात आलेल्या जीएमुळे या अवस्थेत
संजीवकांचे संतुलन बिघडते.
परिणाम म्हणजे मणी सेटिंगनंतर मण्यामध्ये विविधता दिसून येईल. याकरिता
दोडा अवस्थेत आवश्यक असलेली अन्नद्रव्ये उदा. बोरॉन, मॉलिब्डेनमची कमी
प्रमाणात फवारणी करावी.
प्रिब्लूम
अवस्थेत शक्यतोवर संजीवकांचा जास्त वापर टाळावा. दोडा अवस्थेत या वेळी गळ
जास्त प्रमाणात होताना दिसते. ही गळ साधारणतः ३२ ते ३६ दिवसांच्या
कालावधीमधील बागेत दिसते.
वाढत्या
आर्द्रतेमुळे संजीवकांचे बिघडलेले संतुलन, विशेषतः कमी झालेल्या
सायटोकायनीनमुळे गळ होते. या वेळी वेलीचा जोमसुद्धा वाढताना दिसून येईल.
या
वेळी बागेत वाढीचा जोम कमी करण्याकरिता पालाश ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी आणि
सायटोकायनीन घटक असलेले संजीवक ०.७ ते १ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. यामुळे गळ होणार नाही.
0 comments:
Post a Comment
Please add comment