गुगलचे स्मार्ट स्पीकर नेस्ट मिनी लॉन्च


पिक्सल 4 सीरिजसह जगात लॉन्च झालेला गुगलचा स्मार्ट स्पीकर गुगल नेस्ट मिनी भारतात नुकताच लॉन्च झाला आहे. गुगलचे नेक्स्ट मिनी दोन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या गुगल मिनीचे अपग्रेटेड व्हर्जन आहे.

गुगल होम मिनीच्या तुलनेत गुगल नेस्ट मिनीतील काही डिजाइन व स्पेसिफिकेशनमध्ये बदल केले आहेत. पॉवर कनेक्टर व केबल दिली आहे. 

गुगल नेस्टचे डिजाइन गुगल होम मिनीशी काही प्रमाणात मिळते जुळते आहे. नव्या डिजाइनमध्ये मायक्रोफोन स्लायडर स्विच व फॅब्रिक टॉप कव्हरखाली लाइट्‌स दिल्या आहेत.

नेस्ट मिनीच्या स्पीकरचा आवाज इतर स्पीकरपेक्षा अधिक चांगला असल्याचा दावा गुगलने केला आहे. यासाठी डिव्हाइसमध्ये डेडिकेटेड मशीन लर्निंग चिप बसवली आहे.

हे भारतातील सर्वात प्रमुख म्युझिक सर्व्हिसला सपोर्ट करतात. नेस्ट मिनीची किंमत 4,499 रुपये असून, गुगल नेस्ट मिनी स्पीकर फ्लिपकार्टवरून ग्राहक खरेदी करु शकतात.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment