शेतातील कचरा व्यवस्थापन


आपण सर्वजण  शेतकरी किंवा शेतीशी संबंधित आहोत आणि या पर्यावरणाचा एक भाग आहोत . आपण वापरत असलेली खते ,औषधे किंवा विविध निविष्ठा वापरून झाल्यावर त्याचे बॉक्स , बाटल्या ,पिशवी हे तसेच फेकून देतो . ज्यामुळे पर्यावरणाला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.
          
उपाय-
  • शेतात वापरायचे सर्व रसायन काळजी पूर्वक तज्ञानच्या सल्ल्याने वापरा।
  • पर्यावरणाला हानी पोहचवणारे घटक शक्यतो वापरू नका.
  • प्लास्टिक ,फायबर, लोखंड अल्युमिनियम ,काचेचे व इतर  साहित्य शक्यतो साठउन भंगार ला दयावे म्हणजे ते पुनर्निर्मितीसाठी वापरले जाईल.
  • सार्वजनिक ठिकाणी आवषध बनवू अथवा मिसळू नये.
  • लहान मुले वयस्क माणसे या पासून विषारी घटक दूर ठेवावेत.
  • वर्षभरात शेतात वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा(खते, आवषदे, बियाणे) चा कचरा साठवण्यासाठी एक ठराविक जागा असावी.
  • बनवलेले रसायन शिल्लक राहिल्यास कोठे ही फेकू नये त्याची योग्य विल्लेवाट लावावी.
  • आपण शेत जसे तन विरहित ठेवतो तसेच पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या घटकांना ही शेतातून दूर ठेवावे.
            
जर आपण या गोष्टीचा विचार न करता फक्त उत्पन्न उत्पन्न एवढाच विचार करून शेतातील कचऱ्याचे वेवस्थापन केले नाही, तर आज आपण जी खते औषधे शेती साहित्य घेण्यासाठी शासनाकडून अनुदान घेतोय भविष्यात तेच अनुदान साठलेला कचरा काढण्यासाठी घ्यावे लागेल..
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment