राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे.
अशी होणार कर्जमाफी :
▪
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर
केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात
येणार आहे.
▪ 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे.
दरम्यान,
आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी
कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र
आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment