फेसबुकने आपल्या भारतीय युजर्ससाठी फेक न्यूजची माहिती अलर्टसच्या स्वरूपात देणारे फिचर कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे.
फेसबुकने
आधी कर्नाटकातील युजर्सला फेक न्यूजबाबतची माहिती अलर्टच्या स्वरूपात सादर
करण्याची सुविधा बीटा अर्थात प्रयोगात्मक अवस्थेत सादर केली होती.
दरम्यान
आता हेच फिचर सर्व भारतीय युजर्सला देण्याची घोषणा फेसबुकतर्फे केली आहे.
याअंतर्गत कोणताही युजर आपल्या टाईमलाईनवरून पाहत असलेल्या बातम्यांपैकी
फेक बातमीची माहिती नोटिफिकेशनने अलर्टद्वारे दिली जाणार आहे.
नोटिफिकेशन
मिळण्यापूर्वी त्या कंटेंटची कसून तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी
फेसबुकने एएफपी इंडिया, फॅक्ट क्रेसेंडो, फॅक्टली, न्यूज मोबाईल फॅक्ट
चेकर, द क्विंट आणि इंडिया टुडे फॅक्ट चेक आदी वृत्तसंस्थांसोबत सहकार्याचा
करार केला आहे.
दरम्यान, एखादे पेज किंवा प्रोफाईलवरून सातत्याने फेक कंटेंट पाठविणाऱ्यावर डिअॅक्टीव्हेशनची कारवाईदेखील केली जाणार आहे.
काही दिवसांमध्ये भारतातील सर्व युजर्सला हे फिचर टप्प्याटप्प्याने देणार असल्याची माहिती फेसबुकतर्फे दिली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment