फेसबुक स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करत असून या गुगलला टक्कर देण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.
गुगलची
अँड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम जगभरात अव्वल स्थानी असून ती अब्जावधी
स्मार्टफोन्समध्ये वापरली जाते. अलीकडेच या प्रणालीचा विस्तार केला असून
वेअरेबल्ससह अन्य स्मार्ट उपकरणांसाठी विविध आवृत्त्या सादर केल्या आहेत.
अद्याप फेसबुकने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी, प्रणाली विकसित करण्याचे काम गतीने सुरू आहे.
फेसबुकची
ऑक्युलस व पोर्टल ही उपकरणे अँड्रॉइडपासूनच विकसित केलेल्या प्रणालीवर
चालतात. भविष्यात अँड्रॉइड वा आयओएसवर अवलंबून न राहण्याचा निर्धार
फेसबुकने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment