डिसेंबर महिन्यात वातावरणात थंडीचे प्रमाण वाढलेले असते. या महिन्यात गहू, हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात. त्याचबरोबर ज्वारी, कापूस, ऊस व लिंबूवर्गीय पिकेही जोमात आलेली असतात. थंड हवामान या पिकांना मानवते; परंतु पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही असते. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाय केल्यास आर्थिक नुकसानापासून वाचता येईल.
●कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करावी. कापूस वेचताना त्यात काडीकचरा, पत्ती, नख्या, कागदाचे तुकडे, केस इ. येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
● कपाशी ओलसर असल्यास २-३ दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून कोरड्या जागेत साठवण करून नंतर त्याची विक्री करावी व कवडी कापूस वेगळा गोळा करून सर्वांत शेवटी विकावा.
● सुधारित कपाशीच्या पहिल्या व दुस-या वेचणीतील कापूस वाळवून कोरड्या जागेत साठवावा. याचे वेगळे जीनिंग करुन सरकोचा उपयोग पुढील वर्षी पेरणीकरिता करता येईल.
●कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेतात गुरेढोरे, शेळ्याव त्याचे कोष नष्ट होतील.
◆वेळेवर १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पेरणी केलेल्या बागायती गव्हास उगवणीपासून २० दिवसांनी हेक्टरी ७० किलो युरिया आणि ४२ दिवसांनी ७० किलो युरिया देऊन ओलीत करावे.
◆गव्हाच्या पानावरील करपा व तांबे-याची लागण दिसताच मॅन्कोझेब डायथेन एम ४५ हे बुरशीनाशक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
◆ओलिताचे पाणी मर्यादित असल्यास बागायती गव्हास उगवणीपासून २१, ४२ व ६५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
◆ तूर व हरभरा पिकावर घाटेअळीचा हेलीऑथीस प्रादुर्भाव असल्यास मोठ्या अळ्या वेचून जमिनीत १ फूट खोल खडुष्यात गाडाव्यात. १५ दिवसांनंतर एचएएनपीव्ही या विषाणूची हेक्टरी २ x १० चे २५o एलई अशी फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
◆करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव शेताचे धुन्यावरील पिकावर दिसताच डायमेथोएट ३0 टक्के १o मिलेि. १o लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या कडेवरील २ मीटर भागातच फवारणी करावी.
◆परिपक्र सुरू उसाची तोडणी जमिनीलगत करावी. तोडणीअगोदर
◆ ठिबक सिंचन पद्धतीत ६ दिवस व सरी-वरंबा पद्धतीत १० ते १५ दिवस ओलीत करू नये. पांढरी माशी व लोकरी मावाग्रस्त उसाची पाने गोळा करून जाळावीत.
कागदी लिंबाच्या हस्त बहाराची फळे असलेल्या झाडावर झिंकसल्फेट ५o ग्रॅम अधिक फेरसल्फेट ५o ग्रॅम अधिक कळीचा चुना ४० ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृग बहाराच्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे.
झाडाच्या आळ्यात पालापाचोळ्याचे ४ इंच जाड आच्छादन करावे. कागदी लिंबाच्या पानावर खेच्या रोगाचे तांबूस / तपकिरी रंगाचे ठिपके आढळल्यास स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सक्लोराईड ३० ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानवेलीवरील मर रोगाच्या नियंत्रणाकरिता १o ग्रॅम ट्रायकोडर्मा १o किलो कंपोस्टमध्ये मिसळून प्रति चौ. मी. क्षेत्रात वेलीच्या बुडाशी जमिनीत मिसळावे. जनावरांना तोंडखुरी पायखुरी रोगाची प्रतिबंधक लस पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन टोचावी. तूपिकामध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित ओलीत करावे. तुरीवरील शेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल १२.५ मिलि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
0 comments:
Post a Comment
Please add comment