l डिसेंबर महिन्यात सर्वत्र नाताळच्या सणाचे वेध लागतात. बाजारपेठा विविध
वस्तूंनी नटतात व ख्रिसमस ट्री कसे सजवायची तयारी घरोघरी सुरु होते.
दरम्यान
ब्राझीलच्या रिओ द जानेरो मध्ये नाताळ सणाची तयारी म्हणून पारंपारिक,
तरंगत्या व जगातील सर्वात उंच ख्रिसमस ट्रीचा उद्घाटन सोहळा मोठ्या
उत्साहात झाला. ते पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती.
रोड्रीगो
डी फ्रीटास लगुन मध्ये ही क्रिसमस ट्री उभी केली आहे. नुकताच हा सोहळा पार
झाला. सायंकाळच्या वेळी ही भव्यदिव्य ट्री विविध रंगी रोषणाईने झगमगून
गेली व म्युझिकल शो व आतषबाजी केली.
ख्रिसमस ट्री ची परंपरा : रिओ द जानेरोच्या दक्षिण भागात असे तरंगते व
जगातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री उभे करण्याची प्रथा 1996 पासून सुरु असून
हे स्थान आता प्रतिष्ठेचे बनले आहे.
झगमगाट : 24 मजली
इमारतीच्या उंचीचे म्हणजे 230 फुट उंचीचे हे ख्रिसमस ट्री 11 तरंगत्या
प्लॅटफॉर्मवर उभे केले असून ते 9 लाख एलईडी दिव्यांनी सजले आहे.
शहरातील हे सर्वाधिक आकर्षक स्थळ असून याचे उद्घाटन म्हणजे नाताळच्या तयारीची व सणाची सुरवात मानले जाते.
0 comments:
Post a Comment
Please add comment