नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निर्णय देऊन टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सायरस
मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे नॅशनल कंपनी लॉ
अॅपिलेट ट्रिब्युनलने म्हटले आहे. एनसीएलटी केस हरल्यानंतर सायरस मिस्त्री
यांनी निर्णय़ाविरोधात एनसीएलएटीकडे धाव घेतली होती.
एनसीएलएटीने
जुलै महिन्यात निर्णय सुरक्षित ठेवला होता. (दि.18) नॅशनल कंपनी लॉ
अॅपिलेट ट्रिब्युनलने निर्णय जाहीर करून टाटा समूहाला धक्काच दिला आहे.

सायरस
मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन.
चंद्रशेखरन यांची निवड केली होती. 'टाटा' तर्फे चंद्रशेखरन यांची नियुक्ती
बेकायदा असल्याचे नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलने म्हटले आहे.
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्टोबर 2016 मध्ये तडकाफडकी उचलबांगडी केली होती.
0 comments:
Post a Comment
Please add comment