सरकार लॉन्च करणार व्हॉट्सअ‍ॅपसारखे चॅटिंग अ‍ॅप


केंद्र सरकार सध्या एका मल्टीमीडिया मॅसेजिंग अ‍ॅपची टेस्टिंग करत असून, हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप व आणि टेलिग्रामसारखेच असणार आहे. या अ‍ॅपचे कोड नाव GIMs म्हणजेच गर्व्हमेंट इंस्टेंट मॅसेजिंग सिस्टम आहे.

अ‍ॅपची टेस्टिंग सध्या ओरिसामध्ये सुरू असून, ट्रायल म्हणून याचा सर्वप्रथम वापर नौदलात केला जाणार आहे.

GIMs अ‍ॅपला नॅशनल इंफोर्मेशन सेंटर, केरळ युनिटने डिझाईन केले आहे. या अ‍ॅपचा वापर सरकारी कर्मचारी व सरकारी संस्था अधिकृत संपर्कासाठी होणार आहे.

दरम्यान सप्टेंबरच्या प्रारंभीला या अ‍ॅपचे आयओएस व्हर्जन लॉन्च केले होते. हे व्हर्जन आयओएस 11 व त्यावरील व्हर्जनसाठी होते. सध्या अँड्राईड व्हर्जनवर काम सुरू आहे.

ओरिसा सरकारच्या फायनान्स डिपार्टेमेंटमध्ये पायलट प्रोजेक्ट अंतर्गत याचे टेस्टिंग सुरू असून सर्व कर्मचाऱ्यांना हे अ‍ॅप फोनमध्ये इंस्टॉल करण्यास सांगितले आहे.

फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप सारख्या परदेशी अ‍ॅपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने हा निर्णय घेतला आहे. GIMs अ‍ॅप देखील एंड-टू-एंड इंक्रिप्टेड असणार आहे. हे अ‍ॅप फक्त वयक्तिक संवादासाठी असणार आहे, ग्रुप चॅटिंगसाठी नाही.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment