CAA, NRC बाबत अर्बन नक्षली अफवा पसरवताहेत : मोदी


'सीएए' व 'एनआरसी'बाबत अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. असे म्हणत  देशातील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

 दिल्लीतील रामलीला मैदानावर 'धन्यवाद रॅली'ला संबोधित करत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 

 माझ्या पुतळ्याला जोडे मारा. पण देशातील गरिबांच्या गाड्या जाळू नका. अशी भावनिक साद घालत मोदींनी शांततेचे आवाहनही यावेळी केले. 

मोदी म्हणाले : नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. 

▪ हा कायदा नेमका काय आहे, नेमकी दुरुस्ती काय आहे, याचा अभ्यास न करता देशातील दलितांचे काही नेते या वादात पडले आहेत. 

▪ दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने मिळणार नाहीत. आतापर्यंत दिल्लीकरांना खोट्या आश्वासनांना बळी पडावे लागले. ते आता होणार नाही. 

▪ कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही. आम्ही काम करत होतो, तर त्यात आडकाठी आणण्याचे काम केले गेले. 

 फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी या सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली आहेत. 






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment