आहारात
वांग्याची भाजी, भरीत यासाठी उपयोग होतो. वांग्यामध्ये खनिजे अ ब क ही
जीवनसत्वे असतात. महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाजे 28 हजार 113 हेक्टरी
क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यामुळे जाणून घेऊ वांगी पिकासाठीची माहिती...
हवामान :
▪ ढगाळ हवामान वांगी पिकाला मानवत नाही.
▪ 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पिक चांगले येते.
जमीन :
▪ हलक्या जमिनीतही वांग्याचे पिक येते.
▪ पाण्याचा निचरा होणारी जमिन असावी.
लागवडीचा हंगाम :
▪ वांग्याची लागवड तिनही हंगामात करता येते.
पूर्वमशागत :
▪ जमीन नांगरून व कुळवून भुसभुशीत करावी.
▪ हेक्टरी 30 ते 50 गाड्या शेणखत वापरावे.
वाण :
▪ मांजरी गोटा I वैशाली I प्रगती I अरूणा
रोंगाचे प्रकार :
▪ किड: किड या रोगामुळे पिकाचे नुकसान होते.
▪ मावा: हा रोग पानातील रस शोषून घेते.
पिकांची काढणी :
▪ रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यानी फळे तयार होतात.
▪ 4 ते 5 दिवसांच्या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्याची तोडणी करता येते.
0 comments:
Post a Comment
Please add comment