राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लावावा, अन्यथा राज्यातील साखर कारखाने बंद करू, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला.
वांगी (ता. कडेगाव)
येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे राज्य साखर
कामगार प्रतिनिधी मंडळ, राज्य साखर कामगार महासंघ आणि जिल्हा साखर कामगार
समन्वय समितीच्यावतीने कामगारांचा मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते.
काळे
म्हणाले की, त्रिपक्षीय समितीची मुदत ३१ मार्चला संपली. नवीन समिती
स्थापण्याचा निर्णय प्रलंबित आहे. १५ डिसेंबरपर्यंत समिती स्थापन करून
मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर कारखान्यांची धुराडी बंद केली जातील.
समितीचे
कामकाज सुरळीत सुरू होईपर्यंत कामगारांना पाच हजार रुपये अंतरिम पगारवाढ
द्यावी, साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरते काम
करणाऱ्या कामगारांना अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील
तरतुदीनुसार वेतन मिळावे, कामगारांचे थकीत वेतन मिळण्यासाठी राज्य सरकारने
स्वतंत्र निधी उभारावा, बंद पडलेल्या साखर कारखान्यांतील कामगारांच्या
प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा, सेवानिवृत्त कामगारांना ७५०० रुपये
पेन्शन मिळावी, या कामगारांच्या मागण्या आहेत.
एफआरपीच्या
मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक असताना, आता राज्यातील साखर कामगारांनी
पगारवाढीच्या मागणीसाठी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आपल्या
हक्कासाठी आता तीव्र लढा दिला जाईल.
त्यामुळे कामगारांच्या मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment