
नियम शेतकर्यांच्या कर्ज माफीचा मुद्दा विरोधी पक्षाकडून वारंवार ऐरणीवर आणला जात असला तरी राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याच्या तयारीत असून ही कर्जमाफी दोन टप्प्यात केली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
यातील पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपायच्या आत मार्च 2020 च्या आधी देण्यात येणार असून दुसरा टप्पा एप्रिल 2020 मध्ये दिला जाणार आहे.
कर्जमाफीचा
आढावा घेण्यासाठी सरकारने एक विशेष टीम नियुक्त खेळू असून ही टीम नियमित
आढावा घेत आहे. या टीमने सर्व बँकांकडून याबाबतची माहिती मागवली आहे.
सरकारने
शेतकरी कर्जमाफी बाबत स्पष्टता आणण्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती,
कर्जाची नेमकी आकडेवारी आणि कर्जमाफीसाठी उभी करावयाची रक्कम याबाबत नियोजन
करण्याचे काम या टीमकडे सोपवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेतकरी
कर्जमाफीचा मुद्दा सर्व पक्षांकडून प्रतिष्ठेचा बनवला जात आहे. अवकाळी
नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी राज्याची सूत्रे हाती घेण्याअगोदर शेतकर्यांना दिलासा देण्याचा
प्रयत्न केला होता. तोच मुद्दा प्रतिष्ठेचा करून विरोधी पक्षाकडून
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र
उद्धव ठाकरे यांनीही शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी कंबर कसली असून त्यांच्या
या प्रयत्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून साथ मिळत असल्याचे
खात्रीलायक वृत्त आहे.
शेतकर्यांच्या
कर्जमाफीसाठी विविध अर्थ तज्ञांकडून माहिती ती आणि सल्ला घेतला जात आहे.
कर्जमाफी चा अनुभव असलेले दोन पक्ष सध्या शिवसेनेसोबत सत्तेमध्ये असल्याने
हा निर्णय नक्की तडीस जाऊ शकतो, असा विश्वास उद्धव ठाकरे यांना आहे .
0 comments:
Post a Comment
Please add comment