झारखंडमध्ये प्रादेशिक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) भाजपला जोरदार धक्का दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे सर्व दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. या सर्वांना टक्कर देत JMMचे नेते हेमंत सोरेन यांनी कमाल केलीय. विधानसभा निकालात सर्वाधिक जागा मिळवून JMM काँग्रेस आणि आरजेडी सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. निकाल जसे येत होते तसे भाजपच्या गोटात सामसूम होती तर काँग्रस आणि JMM च्या गोटात आनंद होता. JMMचे नेते हेमंत सोरेन हे त्यांचे वडिल शिबू सोरेन यांच्यासोबत घरीच निकाल बघत होते. निकाल येत गेले आणि त्यांचा ताण निवळला. निकाल जस जसे येत गेले तसं JMMमध्ये कधी आनंद तर तणाव होता. JMMला जेव्हा उत्तम बढत मिळाली ते हेमंत सोरेन यांच्या चेहेऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. काही वेळानंतर तर त्यांनी घराच्या आवारात सायकल चालविण्याचाही आनंद घेतला. त्यावेळी सगळ्यांनाच हेमंत सोरेन यांना या रुपात बघून आनंद झाला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment
Please add comment