
नोव्हेंबर महिन्यात परतीचा पाऊस चांगलाच बरसला. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामाचा पेरा अतिशय चांगला झाला. मात्र पहिल्यांदाच रब्बी हंगामातील ज्वारी व हरभरा या दोन पिकांवर लष्करी अळीचा मारा झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत नवी भर पडली आहे.
खरीप हंगामातील
मक्यावर लष्करी अळीचा हल्ला होतो हे शेतकऱ्यांना ज्ञात आहे. मात्र यावर्षी
कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी व हरभरा अशा अन्य पिकांवरही लष्करी अळीचा
हल्ला होत असल्याने शेतकऱ्यांना यातून सुटका कशी करून घ्यायची? याची चिंता
लागली आहे.
लष्करी अळी ही पाने कुरतडून पोंग्यात शिरते. त्यामुळे पानाची प्रत खराब होते. या किडीचे पतंग एका वेळी १ हजार अंडी पुंजक्यात देते.
त्याचबरोबर एका रात्रीत एक पतंग दहा किलोमीटर अंतर पार करून जातो. त्यामुळे अळीचा प्रसार खूप वेगाने होतो.
यावर्षी जिल्हय़ात वेगवेळय़ा कालावधीत पेरणी झाली असल्यामुळे अळीच्या जीवनक्रमातील वेगळय़ा अवस्थेत पोषक वातावरण मिळते आहे.
लष्करी
अळी ही प्रारंभी अमेरिका व नंतर आफ्रिका खंडात आली. प्रामुख्याने मका व
भात यासह ८० प्रकारच्या वनस्पतीच्या प्रजातीवर याचा प्रादुर्भाव अमेरिकेत
झाला.
त्यानंतर आफ्रिका,
भारत व दक्षिण चीन या देशातही या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मक्याचे
उत्पादन वाढण्यासाठी अमेरिकेचे बियाणे वापरले जाऊ लागले व या बियाणातून
याचा प्रसार होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
उत्पादकता
वाढावी यासाठी देशी बियाणाऐवजी संकरीत बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल
वाढला. उत्पादकता तर वाढली नाहीच शिवाय अळीचा मारा होऊन पिके नष्ट होऊ
लागली.
लष्करी अळीचा
प्रादुर्भाव जमिनीतून होतो. पाऊस जर चांगला अतिरिक्त पडला तर या अळीचे
अस्तित्व संपते असे सांगितले जात होते. यावर्षी लातूर जिल्हय़ात परतीच्या
मान्सूनचा पाऊस २० दिवसात दरवर्षीच्या तुलनेत तिप्पट झाला तरीही लष्करी अळी
संपली नाही.
रब्बीची ज्वारी व हरभऱ्यावर त्याचा मारा होतो आहे. हवामान बदलाचा परिणाम लष्करी अळीवर होत नसल्याचे यातून दिसते आहे.
लष्करी
अळीच्या माऱ्यातून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना देशी वाणाचा वापर केला पाहिजे.
वाणाची जपणूक केली पाहिजे असे कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment