भाजपमध्ये असूनही पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असं आश्वासन भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्याचं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट म्हटलं आहे.
''विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षविरोधी कारवायांबाबत मी चार दिवसांपूर्वीच नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती आणि कशाप्रकारे पक्षातीलच काही मंडळींनी पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध काम केले याची माहिती मी नड्डा यांना दिली. त्यानंतर त्यांच्याकडून मला कारवाईचे आश्वासन मिळाले,'' असा दावा खडसे यांनी केला आहे.
''मी जी माहिती दिली त्याबाबत नड्डा प्रथम राज्यातील नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी करतील,'' असंही खडसे यांनी म्हटलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment