भारतीय लष्कराने जवानांच्या बरोबरीने महत्वाची भूमिका बजावण्यात माहीर
असलेल्या त्यांच्या डॉग स्क्वाडसाठी बुलेटप्रुफ जॅकेट्स आणि ऑडीओ व्हिडीओ
सर्वेलांस सिस्टीम विकसित केली आहे.
याच्या मदतीने हे स्वाड चकमकी
किंवा खास कारवाईच्या वेळी महत्वाची भूमिका पार पडत येणार आहे. गोळीबार
सुरु असतानाही प्रशिक्षित श्वान शत्रूच्या जाऊन सर्व्हेलन्स सिस्टीमच्या
मदतीने शत्रूचे लोकेशन व अन्य महत्वपूर्ण माहिती पुरवतील.
आर्मी डॉग युनिटचें अध्यक्ष लेफ्ट. कर्नल व्ही कमलराज म्हणाले : आमच्याच युनिटने ही विशेष प्रणाली विकसित केली आहे. आर्मी विविध प्रकारच्या कामांसाठी श्वानांना प्रशिक्षित करते.
हे श्वान पथक अवघड कामगिऱ्या पार
पाडतात. त्यामुळे आमच्या या साथीदारांचे संरक्षण ही आमची जबाबदारी आहे.
म्हणून त्यांना बुलेटप्रुफ जॅकेट्स दिली आहेत.
सर्वेलांस सिस्टीममुळे श्वान पथक हेरगिरीदेखील करणार आहे. त्यांच्या पाठीवर कॅमेरा व ट्रान्समीटर रिसिव्हर बसविले जातात.
सर्वेलांस सिस्टीममुळे श्वान पथक हेरगिरीदेखील करणार आहे. त्यांच्या पाठीवर कॅमेरा व ट्रान्समीटर रिसिव्हर बसविले जातात.
श्वानाच्या पाठीवर बसविलेले अॅपसाठी इंटरनेटची गरज नाही. अगदी काही अडथळा आला तरी 1 किमी परिसरातील माहिती हे श्वान देत राहिल.
0 comments:
Post a Comment
Please add comment