राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लिन चीट दिली आहे.
एसीबीने
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे
हे स्पष्ट झाले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा
मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
या पूर्वी अजित पवार यांना विदर्भातील काही सिंचन घोटाळे प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली होती.
सिंचन घोटाळा प्रकरणे :
सिंचन
घोटाळ्या प्रकरणी सिंचन विभागाशी संबंधित 2654 निविदांची चौकशी सुरू आहे.
यांपैकी तब्बल 45 प्रकल्प विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे आहेत. पैकी 212
निविदा प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. या 212 पैकी 24 प्रकरणांची
नोंदणी करण्यात आली आहे.
या
24 प्रकरणांपैकी 5 प्रकरणावंर आरोपपत्र दाखल करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
यांपैकी पुरावे नसल्याने 45 निविदांची चौकशी बंद करण्यात आली आहे. यांपैकी
एकूण 9 केसेस बंद करण्यात आली आहेत. यातील कोणत्याही प्रकरणांशी अजित पवार
यांचा काही संबंध नसल्याचे एसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment