आंतरराष्ट्रीय
क्रिकेट परिषदेनं 2019मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंची निवड केली.
यामध्ये मराठमोळ्या स्मृती मानधनाने मानाचे स्थान मिळवले आहे.
आयसीसीनं जाहीर केलेल्या या संघात भारताच्या स्मृती मानधनासह सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाची
अष्टपैलू खेळाडू एलिसा पेरीनं 2019 च्या महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासह
वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचाही मान पटकावला.
स्मृतीची
कामगिरी : स्मृतीने वन डे क्रिकेटमध्ये 7 सामन्यांत 423 धावा केल्या.
त्यात एक शतक व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 तही तिनं 14
सामन्यांत 4 अर्धशतकांसह 405 धावा चोपल्या. त्यामुळे तिचा वन डे व
ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment