डाळिंब पाणी नियोजन

झाडाची पाण्याची आवश्यकता ही झाडाचे वय, फळांचे वजन, ऋतू आणि मातीचा प्रकार (काळ्या मातीला कमी आणि वालुकामय मातीला जास्त पाणी लागते.) 

या घटकांवर अवलंबून असते. झाडाच्या विश्रांतीच्या काळात जास्त प्रमाणात पाणी देण्याचे टाळा. फळे व्यवस्थित तयार होईपर्यंत आणि फळे तोडणीच्या १ महिना अगोदरपर्यंत पाणी वाढवत जावे. 
त्यानंतर फळ तोडणीपर्यंत पाणी कमी करत जावे. डाळींब झाडाची पाण्याची आवश्यकता २ ते ५० लिटर/झाड/दिवस अशी असते. त्यामुळे झाडाची पाणी आवश्यकता खालीलप्रमाणे ठरविता येते : - झाडाला पाणी द्या. (१ तास) - दुसऱ्या दिवशी (२४ तासांनंतर) १५ ते २० सेंमी खोलीवरील माती हातात घ्या आणि माती दाबून पहा. जर माती मोकळी असेल आणि तिचा गोळा होत नसेल तर पाण्याची कमतरता आहे असे समजून पाणी द्या. 

जर मातीचा गोळा तयार झाला तर तो जमिनीवर फेकावा. - जर गोळा जमिनीवर पडताच पूर्ण फुटून माती जमिनीवर पसरली तर दुसऱ्या दिवशी पाणी द्यावे. - जर गोळा जमिनीवर पडल्यानंतरही तशाच स्वरुपात राहून माती थोड्याच प्रमाणात पसरली तर पाण्याची आवश्यकता नाही असे समजावे. असे सतत तपासून पहावे व योग्य वेळेनंतर बागेला योग्य प्रमाणात पाणी.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment