'एनईएफटी'च्या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
आजपासून (दि.16) ही सुविधा दिवसरात्र सुरू राहणार आहे. यापूर्वी ही सेवा फक्त बँकेच्या कामकाजाच्या वेळेतच मिळत असत, त्यामुळे 'एनईएफटी'चे व्यवहारावर बंधन येत होते.
रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार : 'एनईएफटी'अंतर्गत आर्थिक व्यवहारांची सुविधा आठवड्याचे सातही दिवस मिळणार आहे. 'एनईएफटी' द्वारे एकावेळी 2 लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन पाठविता येते.
'एनईएफटी'द्वारे होणारे व्यवहार बँकिंग यंत्रणेमार्फत सर्वसाधारण सकाळी 8 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण केल्या जातात.
24 तास सेवा : 'एनईएफटी'चे व्यवहार 24 तास मिळण्याचे रिझर्व्ह बँकेने ऑगस्टमध्ये जाहीर केले होते. 15 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजता 24 तास 'एनईएफटी' यंत्रणेतील पहिला व्यवहार पार पडला आहे.
विशेष : रिझर्व्ह बँकेने 'एनईएफटी' व 'आरटीजीएस' सेवा शुल्कमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 'एनईएफटी'द्वारे होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांवर रकमेनुसार 1 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत फी आकारली जाते.
'एनईएफटी'साठी सध्याची फी :
▪ 10 हजार रुपयांपर्यंत : अडीच रुपये
▪ 10 हजार ते 1 लाख : पाच रुपये
▪ 1 लाख ते 2 लाख : 15 रुपये
▪ 2 लाखांपेक्षा अधिक : 25 रुपये
0 comments:
Post a Comment
Please add comment