मनोधैर्य योजना


बलात्कार / बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात 'मनोधैर्य योजना' सुरु केली आहे. सदर योजनेंतर्गत दिनांक 02.10.2013 पासून घडलेल्या घटनांतील पिडित महिला / बालकांना लाभ देण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना सुरु केली आहे.

योजनेच्या प्रमुख अटी :

▪ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांस खालील घटनांमध्ये गुन्ह्यांची नोंद (FIR) झाल्यास लाभ अनुज्ञेय ठरतो.
▪ बलात्कार : भा.दं.वि. कलम 375 व 376, 376(2), 376(अ) व 376(ब) प्रमाणे
▪ बालकांवरील लैंगिक अत्याचार : Protection of Children from Sexual Offenses Act, 2012 कलम 3, 4, 5 व 6 प्रमाणे व Acid हल्ला : भा.दं.वि. कलम 326(अ) ते 326(ब) प्रमाणे.

आवश्यक कागदपत्रे :

▪ बँक पासबुक झेरॉक्स 
▪ घडलेल्या घटनांमध्ये खालील प्रमाणे गुन्ह्यांची नोंद (FIR)

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :

• बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान 2 लाख रुपये व विशेष प्रकरणात कमाल 3 लाख रुपये मदत दिली जाते.
• ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 3 लाख रुपये.
• ॲसिड हल्ल्यात इतर जखमा झाल्यास महिला व बालकांस 50 हजार अर्थसहाय्य.
• पिडित महिला व बालकांना व त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत कायदेशीर सहाय्य, व्यवसाय प्रशिक्षण यासारख्या आधार सेवा पुरवून त्यांचे पुनर्वसन केले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा : 
• जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गुन्हेगारी क्षति सहाय्य व पुनर्वसन मंडळ.
• जिल्ह्यातील District Trauma Team.
 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment