गणित विषय म्हंटल्यावर अनेकांना आजही शाळेत धडकी भरते. मात्र आज (दि.22) राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया काही अशा भारतीयांना ज्यांना गणिताची कधीच भीती वाटली नाही.
1)
श्रीनिवास रामानुजन : रामानुजन जेव्हा इंग्रजी विषयात नापास झाले होते.
त्यांनी नंतर त्यांनी आपली ओळख गणितात प्रस्थापित केली. त्यांनी गणितात 120
प्रमेय निर्माण केले. त्यांनी Analytical theory of numbers, Elliptical
function आणि Infinite series या विषयांवर अभ्यास केला. त्यांचाच जन्मदिन
राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.
2)
आर्यभट्ट : भारताचे सगळ्यांत पहिले गणितज्ज्ञ आर्यभटट् यांना मानले जाते.
असे म्हणतात की पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे, हा सिद्धांत त्यांनी मांडला
आहे. भारताने जगाला शून्य दिला, ती आर्यभट्ट यांच्याच कामाची कृपा आहे.
त्यांच्या या योगदानामुळेच भारताच्या पहिल्या उपग्रहाला त्यांचे नाव
देण्यात आले होते.
3)
शकुंतला देवी : शकुंतला देवी या भारतातल्या सगळ्यांत प्रसिद्ध महिला
गणितज्ञ मानल्या जातात. त्यांना मानवी कॉम्प्युटरही म्हटले जायचे. कारण
त्या कोणत्याही कॅल्क्युटरविना आकडेमोड करायच्या. त्यांनी जगातल्या सगळ्यात
वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50 व्या सेकंदाला 201 चे 23 व वर्गमूळ
काढले होते.
4) सी.आर.
राव : सी.आर.राव त्यांच्या Theory of Estimation साठी ओळखले जातात.
त्यांनी आंध्र विद्यापीठातून गणितात एम.ए.ची डिग्री घेतली. त्यांनी एकूण 14
पुस्तके लिहिली आहेत. अनेक मोठ्या जर्नल्समध्ये त्यांचे 350 रिसर्च पेपर
प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या पुस्तकांचा युरोपीय, चीन, आणि जपानी भाषांत
अनुवाद झाला आहे. 18 देशांतील विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.
5) सी.एस.शेषाद्री : सी.एस.शेषाद्री यांनी Algebraic Geometry या विषयात खूप
काम केले आहे. मद्रास विद्यापीठात गणितात पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई
विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केली. याशिवाय त्यांनी शेषाद्री Constant आणि
नरायशम शेषाद्री Constant चा शोध लावला. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
6)
ब्रह्मगुप्त : इसवी सन 598 ते 668 हा ब्रह्मगुप्त यांचा काळ. त्यांनी
गणित विषयावर ‘ब्रह्मस्फुट सिद्धांत’ हा ग्रंथ लिहिला. गणितीय क्रियांमध्ये
शुन्याचा वापर करणारे ते पहिले गणितज्ज्ञ होते, असे मानले जाते. त्यांच्या
ग्रंथांमधून अनेक गणितीय सूत्रे व सिद्धांत पाहायला मिळतात, जे आधुनिक
काळात अत्यंत महत्त्वाचे ठरले.
7)
भास्कराचार्य-2 : इ.स.वी. 7 शतकातील भास्कराचार्यांच्या जीवनाविषयी कमी
माहिती उपलब्ध आहे. मात्र, ते एक मराठी गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते,
असे काहींचे मत आहे. त्यांनीच शुन्याचा वापर करून भारतीय दशमान पद्धती
अधिक रूढ केली, असे मानले जाते.
0 comments:
Post a Comment
Please add comment