नवीन सरकारकडून क्रीडा क्षेत्राला अपेक्षा

                       
गत महिन्याभरापासून महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय नाट्याला व सत्ता संघर्षाला काल पूर्णविराम मिळाला व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 मात्र असे असतानाच राज्यातील सर्वच क्षेत्रांची कोलमडलेली स्थिती पाहता नव्या सरकारकडून सर्वच क्षेत्राला खूप आशा आहेत. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही.

याविषयी माजी भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू, सध्याचे महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या तांत्रिक समितीचे उपाध्यक्ष हेनरी मेनेझेस यांनी मत व्यक्त केले.
हेनरी म्हणाले :
▪ महाराष्ट्रात 35 जिल्हे आहेत. मागील सरकारने प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा संकुल उभारले होते. राज्य क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत हि क्रीडा संकुले चालवली जातात. 

▪ त्या क्रीडा संकुलांमध्ये विविध खेळांविषयी खूप उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम थोडेसे व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन चालवणे फायदेशीर ठरेल असे मला वाटते.

▪ नवीन क्रीडामंत्री या विषयाकडे लक्ष देतील आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून जिल्हा क्रीडा स्पर्धेत राबविल्या जाणार्‍या उपक्रमांचे नूतनीकरण करतील, अशी मला अपेक्षा आहे.

दरम्यान, हेन्री यांनी ' यामुळे तळागाळातील खेळाडूंना विविध संधी उपलब्ध होऊन अशा खेळाडूंसाठी जागतिक स्तरावर जाण्यासाठी व्यासपीठ निर्माण होईल ', असेही म्हटले आहे.






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment