
भाजप नेते पंकजाताई मुंडे यांच्या एका फेसबुक पोस्टवर त्या "महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीबद्दल" आणि भावी कृतीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज याबद्दल बोलल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये पंकजाताई मुंडे यांनी "माझ्याशी संवाद साधण्यासाठी 8-10 दिवसांची वेळ मला द्या " आणि 12 डिसेंबरपूर्वी त्यांच्या वडिलांचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या 60 व्या जयंतीपूर्वी त्या उत्तर घेऊन परत येतील असे सांगितले. राज्यातील बीड जिल्ह्यातील त्यांच्या वडिलांचे स्मारक असलेल्या गोपीनाथगड येथे त्यांनी 12 डिसेंबर रोजी आपल्या समर्थकांना आमंत्रित केले आहे.
त्या फेसबुक पोस्टवर लिहितात-
नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.
'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.
पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .
मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.
आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे...
आठ ते दहा दिवसांनंतर...हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.
12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?
12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!
येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!
0 comments:
Post a Comment
Please add comment