राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण

आज दिल्लीच्या विज्ञान भवन येथे 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. यामध्ये विविध श्रेणींमध्ये कलाकारांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.दिव्या दत्ता आणि सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जाणून घेऊयात या सन्मानांविषयी...

कलाकार व पुरस्कार :
                        

▪ अभिनेता आयुष्मान खुरानाला 'अंधाधुन' चित्रपटासाठी 'बेस्ट अ‍ॅक्टर' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.

▪ अभिनेता विक्की कौशलला उरी : द सर्जिकल स्ट्राईक सिनेमासाठी 'बेस्ट अ‍ॅक्टर' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.

▪ साऊथ अ‍ॅक्ट्रेस कीर्ती सुरेशला 'महानती' या तेलगू सिनेमासाठी 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.

▪ अभिनेता अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' या सिनेमाला 'बेस्ट सोशल फिल्म' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना 'दासाहेब फाळके' पुरस्काकारानं सन्मान देण्यात आला.
सुरेखा सिक्री यांना बधाई हो मधील चमकदार कामगिरीबद्दल नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.

                         

4 बाल कलाकारांना पुरस्कार :
बाल कलाकार मास्टर रोहित, मास्टर समीप सिंह रणौत, मास्टर ताल्हा अरशद आणि मास्टर श्रीनिवास यांना नॅशनल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. 77 वर्षीय बच्चन हे तापाने आजारी आहेत. बच्चन यांनी ट्विटरवरून हि माहिती दिली. 

दरम्यान, याव्यतिरिक्त अनेक भाषिक चित्रपटनांही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.







About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment