टीव्हीचा नावाजलेला चेहरा कुशल पंजाबीचं वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झालं. ही बातमी कुशलचे जवळचे मित्र करणवीर बोहरा आणि चेतन हंसराज यांनी खरी असल्याचं सांगितलं. काल राहत्या घरी कुशलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. आज दुपारी १ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
करणवीर बोहराने शेअर केली बातमी-
कुशलच्या आत्महत्येची बातमी करणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली. कुशल आणि करणवीर फार चांगले मित्र होते. करणवीरने कुशलचा फोटो शेअर करत एक भावनिक मेसेज लिहिला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुझ्या निधनाच्या बातमीमुळे मी पुरता हललो आहे. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास नाहीये. मला माहितीये तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहशील. ज्या पद्धतीने तू तुझं आयुष्य जगलास तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस.. पण मला काय माहीत होतं...'

0 comments:
Post a Comment
Please add comment