31 डिसेंबरआधी ही महत्त्वाची कामं केली नसतील तर आवश्य करून घ्या.

मुंबई : नव्या वर्षासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. नव्या वर्षात काही नवे नियम लागू होणार आहेत. तर नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्यानं त्यासंदर्भातील माहिती तुम्ही घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 डिसेंबरआधी ही महत्त्वाची कामं केली नसतील तर आवश्य करून घ्या. अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे या 4 गोष्टी या वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही करणं गरजेचं आहे.

1. तर बंद होतील Debit-Credit कार्ड

31 डिसेंबर 2019 पर्यंत तुम्ही जुनं डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदललं नाहीत तर हे कार्ड ब्लॉक होईल. मॅग्नेटिक स्ट्राइप असलेली कार्ड बँका बंद करणार आहेत. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे दोन प्रकार आहेत. यामध्ये एक मॅग्नेटिक स्ट्राइप आणि दुसरं चिप असलेलं कार्ड असतं. आता मॅग्नेटिक स्ट्राइप कार्ड बंद होणार आहेत. ही कार्ड बदलण्याची डेडलाइन 31 डिसेंबर 2019 पर्यंत आहे. ग्राहकांचा डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा तपशील सुरक्षित राहावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
2. सबका विश्वास योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तुम्ही जर कोणत्या सेवा किंवा अबकारी कराच्या वादात अडकला असलात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही या वादात अडकला असाल अथवा अडकण्याची शक्यता असेल तर 31 डिसेंबरआधी तुम्ही मोदी सरकारने सुरु केलेल्या सबका विश्वास योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी केवळ 7 दिवसांचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. कारण ही योजना सरकारनं नव्या वर्षात म्हणजेच 31 डिसेंबरनंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
3. ITR फाईल केला नाही तर भरावा लागेल दुप्पट दंड
तुम्ही 31 डिसेंबरआधी इन्कमटॅक्स रिटर्न भरला नाहीत तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत आयटीआर भरला तर 5000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. नव्या वर्षात हा दंड जवळपास दुप्पट होणार असल्यानं 31 डिसेंबर आधीच आयटीआर भरून घ्या.
4. 31 डिसेंबर आधी पॅन-आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड ठरेल अवैध
तुम्ही पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलं नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. या महिन्या अखेरपर्यंत पॅन आधारसोबत लिंक करणं बंधनकारक आहे. यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. वारंवार इनकम टॅक्स विभाकडून याबाबत मुदत वाढ देण्य़ात आली होती.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment