2019 या वर्षातील सर्वाधिक Hit ठरलेले ' Top 5' Apps


2019 मध्ये अनेक खळबळजनक घडामोडी झाल्या. यात टेक्नोलॉजीच्या जगातही अनेक नवनवीन बदल झाले. यंदाच्या वर्षात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले

2019 मधील टॉप '5' अ‍ॅप्स:

1) Tiktok : टिकटॉक हा अ‍ॅप बिजींगच्या ByteDance कंपनीने बनवलेला अ‍ॅप आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांवर किंवा डायलॉगवर तुमचे छोटे व्हिडिओ बनवू शकता. काही लोक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांना चॅलेंजेस देऊ लागले.

2) NetFlix : वेबसीरिज हा प्रकार सध्या सोशल मिडियावर इतका धुमाकूळ घालत आहे. या वेबसीरिजला डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी नेटफ्लिक्स एक उत्तम माध्यम बनले.

3) Google Pay : डिजिटल पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी गुगल पे एक उत्तम माध्यम बनले. या अ‍ॅपच्या माध्यमातून झटपट ऑनलाईन बँक व्यवहार, शॉपिंग, बिल भरणे अगदी सोपे झाले.

4) Helo : Helo हे भारतातले बेस्ट सोशल अ‍ॅप आहे. 50,000,000+अधिक वापरकर्त्यांसह विनामूल्य डाउनलोड चित्रे/व्हिडिओज शेअरिंग, चॅटिंग आणि मित्र बनविण्याकरिता एक उत्तम भारतीय सामाजिक अ‍ॅप आहे.

5) UTS : डिजिटल माध्यमाद्वारे कॅशलेस पद्धतीने रेल्वे तिकिट काढणे सोपे करण्यासाठी UTS अ‍ॅप खूपच फायदेशीर ठरले. हे सरकारी अ‍ॅप असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त रक्कम न जाता रेल्वे तिकिटाची मुळात जी किंमत ठरविण्यात आली आहे तेवढीच रक्कम वापरु जाऊ लागले. यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लावण्यापासून रेल्वे प्रवाशांची सुटका झाली.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment