एका बाजूला आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वी आदित्य ठाकरे सोनिया गांधी यांच्या भेटीला गेल्याचं वृत्त आहे. त्यांनी शपथविधी सोहळ्याला यावं असं निमंत्रण देण्यासाठी आदित्य दिल्लीला सोनिया यांना भेटण्यासाठी गेले होते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव यांना स्वतःहून फोन करून अभिनंदन केलं, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
महाराष्ट्र राज्य पुढे जाण्यासाठी सर्व मदत करण्याचा शब्द पंतप्रधान मोदी यांनी दिला असल्याचं राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, या प्रश्नावरसुद्धा राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल, असं ते म्हणाले. "आता उद्धवजी फक्त वडील नाहीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत", असंही त्यांनी सांगितलं. मी सरकारचा भाग नाही, असंही सांगायला ते विसरले नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार होणार का या प्रश्नावर राऊत म्हणाले, "हा आता राष्ट्रवादीचा निर्णय आहे. शरद पवार महाविकासआघाडीचे सर्वात मोठे नेते आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील."
फडणवीस यांच्यावर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी थेट टीका केली होती. त्याबद्दल विचारलं असता राऊत म्हणाले, "खडसे आमच्या संपर्कात आहेत." राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खडसे आता भाजपला सोडचिठ्ठी देणार का याची चर्चा सुरू आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment