जागतिक बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला

जागतिक बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला


- दरवर्षी 20 नोव्हेंबर या दिवशी जगभरात ‘सार्वत्रिक बालदिन / जागतिक बालदिन / जागतिक बालहक्क दिन’ (World Children’s Day) साजरा केला जातो.

- यावर्षी 1989 साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून “बालहक्क करारनामा” (Convention on the Rights of the Child) स्वीकारण्यात आल्याच्या घटनेला 30 वर्ष पूर्ण झालीत.

- लहान मुलांमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच त्यांच्या अधिकारांची जाणीव पालकांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.

▪️जागतिक बालदिनाची पार्श्वभूमी

- 20 नोव्हेंबर ही तारीख निवडण्यामागचे कारण म्हणजे, 1959 साली ह्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने “बालहक्क घोषणापत्र” (Declaration of the Rights of the Child) स्वीकारले होते. शिवाय 1989 साली ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर स्वाक्षर्‍या झाल्या.

- सर्वात पहिला बालदिन ऑक्टोबर 1953 मध्ये जिनेव्हाच्या 'इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड वेल्फेअर' या संघटनेच्या पुढाकाराने जगभर साजरा करण्यात आला. त्यानंतर व्ही. के. कृष्णमेनन ह्यांनी आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पनेला प्रोत्साहन देत ती सभेपूढे मांडली, जी 1954 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने स्वीकारली. त्यानुसार, 1954 साली 20 नोव्हेंबरला प्रथम जागतिक बालदिन साजरा झाला.

- बालहक्कांमध्ये जगण्याचा अधिकार, ओळख, आहार, पोषण आणि आरोग्य, विकास, शिक्षण आणि मनोरंजन, नाव आणि राष्ट्रीयत्व, कुटुंब आणि कौटुंबिक वातावरण, दुर्लक्ष होण्यापासून सुरक्षा, शोषण, दुर्व्यवहार तसेच बालकांच्या बेकायदेशीर व्यापारापासून बचाव आदी बाबींचा समावेश होतो.

- भारतात बालकांची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मार्च 2007 मध्ये राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षेसाठी एक आयोग वा संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली. बालहक्कांबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी गैर-सरकारी संस्था, सरकारी विभाग, नागरी समाज, स्वयंसेवी संघटना आदी यांच्याद्वारा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment