हरभरा लागवड आणि पद्धत :
जमीन :
मध्यम ते भारी
पूर्व मशागत :
सिंचनाच्या सोईसाठी जमिनीच्या उतारानुसार सारा यंत्राने वरंबे आणि रिजरने दांड तयार करुन रान बांधणी करावी.
पेरणीची वेळ :
कोरडवाहूसाठी ऑक्टोबरचा पहिला पंधरवाडा, बागायतीसाठी ऑक्टोबरचा शेवटचा ते नोव्हेंबरचा १ ला आठवडा
सुधारित व संकरित वाण :
1) देशी वाण :
बीडीएन–९-३, बीडीएनजी–७९७ (आकाश), फुले जी–१२, फुले जी–५ (विश्वास), विजय, विशाल, दिग्वीजय, जाकी, साकी
2) काबुली वाण :
श्वेता (आयसीसीव्ही–२), पीकेव्ही (काबुली-२), विराट (फुले जी- ९४४१८)
3) हरित दाण्यांचा वाण (पुलाव व उसळीकरिता) :
हिरवा चाफा (एकेजीएस–१)
4) गुलाबी हरभरा (फुटाण्याकरिता) :
डी–८, गुलक–१
लागणारे बियाणे (कि./हे.) :
५० किलो, पेरणीपूर्वी पीएसबी, रायझोबियम जिवाणू संवर्धनाची आणि ट्रायकोडर्मा व्हीरीडी या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणीचे अंतर (सेंमी.) :
कोरडवाहू ३०×१० बागायतीमध्ये ४५×१०
रासायनिक खते (कि./हे.) (नत्र:स्फुरद:पालाश) :
२५:५०:०० संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी पेरुन द्यावी.
आंतर मशागत :
एक खुरपणी व एक कोळपणी
पीक पद्धती व विशेष माहिती :
दोन पाण्याच्या पाळ्या, पेरणीनंतर ४५ व ७५ दिवसांनी दिल्यास उत्पन्न निश्चित वाढते. पिकात पाणी साचू देऊ नये. मर रोग प्रतिकारक वाण पेरावेत. ओलिताखाली हरभरा व जवस (४:२) ही आंतरपिक पद्धत वापरावी.
कीड व्यवस्थापन :
1) घाटेअळी :
अळी हिरवट रंगाची असते. अळी पानावर, कोवळया घाटयावर जगते. ती घाटयाला छिद्र पाडून डोके आत खुपसते व आतील दाणे खाते.
व्यवस्थापन :
पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल. ई. विषाणूची प्रति हे. फवारणी करावी.
क्विनॉलफॉस २५ ईसी १००० मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी १५० ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का प्रवाही अ ट्रायझोफॉस ३५ टक्के प्रवाही मिश्र कीटकनाशक १२५० मिलि ५०० लि. पाण्यात प्रति हेक्टर फवारावे.
रोग नियंत्रण :
हरभरा : मर, मुळकुजव्या
रोग : स्टंट मर (खुटपण)
औषधाचे नाव आणि मुळ घटाकची त्रिवता : ७५ ईसी (कॉलीक्झीन) मावा किडीचा बंदोबस्त त्या किटकनाशकाने करावा
लागणारी औषधे + पाणी (प्रति हेक्टरी) :
२० किलो / हेक्टरी १२५० ग्रॅम + ५०० लि. पाणी ५०० मिली + ५०० लि. पाणी, ५०० मिली + ५०० लि. पाणी
0 comments:
Post a Comment
Please add comment