करडई लागवड आणि पद्धत                                      

                                              करडई लागवड  आणि पद्धत 


जमीन :
मध्यम ते भारी

पूर्व मशागत :
एक नांगरट व २-३ वखराच्या पाळ्या

पेरणीची वेळ :
बागायती ३० ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत

सुधारित व संकरित वाण 
१. सुधारीत वाण :
शारदा (बीएसएफ–१६८–४), अनेगिरी–१, नारी–६, परभणी कुसूम (पीबीएनएस–१२), फुले कुसूम (जेएलएसएफ–४१४), परभणी–४० (पीबीएनएस–४०)

 2. संकरित वाण :
–१२९, एमकेएच–११, नारी एनएच–१

लागणारे बियाणे (कि./हे.) : १२ ते १५ किलो
पेरणीचे अंतर (सेंमी.) : ४५×२० सेमी
रासायनिक खते (कि./हे.) (नत्र:स्फुरद:पालाश) :
२०:२०:०० कोरडवाहूसाठी संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. बागायतीसाठी ६०:४०:०० पेरणीच्या वेळी ३० किलो नत्र व ४० किलो स्फुरद आणि ३० किलो नत्र एक महिन्यांनी द्यावे.

आंतर मशागत : १ खुरपणी व १ कोळपणी
पीक पद्धती व विशेष माहिती :
संकरीत ज्वारीच्या कापणी नंतर कमीत कमी मशागत करुन करडईचे पीक पेरावे. फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे. अधिक भाव येण्यासाठी जुन महिन्यात बाजारपेठेत विकावे.

कीड व्यवस्थापन :
1) मावा :

काळसर रंगाचा असतो. पिल्ले तांबडी तपकिरी असतात. मावा पानाच्या खालच्या बाजूने तसेच खोडातून रस शोषून घेतात. जर माव्याचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असेल तर संपूर्ण झाड मरते. मावा मधासारखा द्रव झाडावर सोडतो. यावर काळी बुरशी वाढते व उत्पन्न घटते.
व्यवस्थापन :

२५ ईसी १००० मिलि किंवा थायामिथॉक्झाम २५ डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा असिटामीप्रिड २० एसपी १०० ग्रॅम किंवा ॲसिफेट ७५ टक्के एसपी २०० ग्रॅम किंवा डायमिथोएट ३० ईसी ५०० मिलि प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
2) उंटअळी व बोंड पोखरणारी अळी :

व्यवस्थापन :

४ टक्के अथवा मिथील पॅराथिऑन २ टक्के अथवा क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी २० कि.ग्रॅ. हेक्टरी धुरळावी.
रोग नियंत्रण :
 करडई : मर रोग

 खोल नांगरणी :

हंगाम संपल्यावर किंवा उन्हाळयात खोल नांगरणी केल्यास जमिनीव्दारे उदभवणा-या अनेक रोगांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
करडई : मर, मुळ कुजव्या

रोग : मर व इ. रोग

प्रति किलो ग्रॅम बियाणास लागणारे औषध / प्रमाण : १.५ ग्रॅम थायरम + १.५ ग्रॅम बावीस्टीन

रोग : अल्टरनेरियाचे ठिपके

औषधाचे नाव आणि मुळ घटाकची त्रिवता : डायथेन एम -४५ डायथेन झेड-७८ किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड

लागणारी औषधे + पाणी (प्रति हेक्टरी) : १२५० ग्रॅम + ५०० लि. पाणी, १२५० ग्रॅम + ५०० लि. पाणीAbout Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment