मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

लोणावळा:  मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
हा अपघात नेमका कशामुळं झाला हे कळू शकलेलं नाही. अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर कार (एमएच ११ सीएच १८८९) सजविण्यात आली होती. सातारा येथून लग्नसमारंभ उरकून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. भरधाव असलेल्या या कारनं मागच्या बाजूनं टँकरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या कारचा अक्षरश: चुराडा झाला. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दोघे गंभीर जखमी आहेत. स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment