मोहरी लागवड व मशागत
जमीन : मध्यम व निचरा होणारी
पूर्व मशागत : एक नांगरट व २-३ वखरण्या
पेरणीची वेळ : नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात
सुधारित व संकरित वाण : पुसा बोल्ड, सीता
लागणारे बियाणे (कि./हे.) : सलग पिकासाठी ५ किलो, पूसा बोल्ड जातीचे बियाणे वापरावे.
पेरणीचे अंतर (सेंमी.) : ४५×२० सेमी
रासायनिक खते (कि./हे.) (नत्र:स्फुरद:पालाश) :
२५:२५:०० मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी, व २५ किलो नत्र एक महिन्यांनी द्यावे.
आंतर मशागत : दोन कोळपण्या व एक खुरपणी
पीक पद्धती व विशेष माहिती : शेंगा पिवळ्या पडू लागताच काढणी करावी. शक्यतो काढणी सकाळचे वेळी करावी.
कीड व्यवस्थापन : मावा
व्यवस्थापन :
माव्याचा प्रादुर्भाव दिसून येताच थायोमेटॉन २५ ईसी ४०० मिलि किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १४०० मिलि ५०० लि. पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
0 comments:
Post a Comment
Please add comment